प्रत्येकाच्या जीवनात वाढदिवस हा एक खास दिवस असतो. या दिवशी प्रत्येकाला वाटते कि आपल्या जवळच्या माणसांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाव्यात, या मिळालेल्या दोन गोड शब्दांनी त्यांचा हा आनंद दुप्पट होतो.
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Birthday Wishes in Marathi Text
- मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Friend
- मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Friend Girl
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ | Birthday Wishes in Marathi for Brother
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण | Birthday Wishes in Marathi for Sister
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो / नवरोबा | Birthday Wishes in Marathi for Husband
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको | Birthday Wishes in Marathi for Wife
- आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Aai Birthday Wishes in Marathi
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा | Birthday Wishes in Marathi for Son & Baby
- काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Kaka
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब | Birthday Wishes in Marathi for Sir / Boss
- मजेशीर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Funny Birthday Wishes in Marathi
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Birthday Kavita in Marathi
- शिवमय वाढदिवसाच्या शुभेच्छा | Shivmay Birthday Wishes in Marathi
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ
- या लेखातील शेवटचे शब्द
पण कधी कधी आपल्या मनात अश्या काही भावना असतात ज्या आपल्याया त्यांच्यासोमोर त्या शब्दांत मांडणं कठीण जातं. म्हणूनच इथे आम्ही आपल्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये एकत्र केल्या आहेत.
यामध्ये तुम्हाला मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण, आई, नवरा, बायको, काका, मुलगा किंवा साहेब, प्रत्येकासाठी योग्य शुभेच्छा इथे मिळतील. येथे आपल्याला Happy Birthday Wishes in Marathi मधले छोटे मेसेज, भावनिक संदेश, मजेशीर शुभेच्छा आणि कविता सापडतील.
तुमची आवडती शुभेच्छा निवडा, कॉपी करा आणि WhatsApp, Instagram किंवा Facebook वर शेअर करून तुमच्या जवळच्या व्यक्तीचा दिवस खास बनवा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Birthday Wishes in Marathi Text

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात आनंद असो, तुमचे जीवन यशाने नेहमी फुलत राहो…! वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जावो, तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपलं संपूर्ण आयुष्य सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..! वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!
आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.
.“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
🥳🎂 ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !! 🥳🎂
तुमच्या जीवनात प्रत्येक पावलावर नवा उत्साह आणि आनंद येवो. तुमच्या सर्व स्वप्नांना पंख लागो आणि पूर्ण होवोत.” वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!
🥳🎂शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता
लाभो मस्तकी मानाचे तुरे..🥳🎂
🥳🎂जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🥳🎂

🥳🎂 व्हावास तू दीर्घायुषी, जगावस तू शतायुषी, ही एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी… वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा! 🥳🎂
🥳🎂 आपणास निरोगी आरोग्यासह उदंड आयुष्य, सुख आणि समाधान लाभो. आपली उत्तरोत्तर प्रगती होवो ही वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🥳🎂
🥳🎂 आनंद तुझ्या जीवनातून कोठेही जाऊ नये, अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही येऊ नये, पूर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा, तुझ्यासारखा ____ प्रत्येकाला मिळावा/मिळावी हीच सदिच्छा…! जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🥳🎂
🚩!! जय महाराष्ट्र !!🚩
🙏🏻आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻
🥳🎂 आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! 🥳🎂
🥳🎂 तुमच्या जीवनात आशा आणि प्रेमाची कधीही कमी होऊ नये. तुमच्या जीवनात प्रत्येक दिवस नवा चांगला अनुभव घेऊन येवो. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🥳🎂
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Friend

🥳🎂 तुला तुझ्या आयुष्यात सुख,आनंद आणि यश लाभो.तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो…. वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🥳🎂
🥳🎂 भावा, तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
देव करो आणि तुला या वर्षी
आयुष्यातील सर्व सुख, समृद्धी आणि यश मिळो
आपली मैत्री अशीच जन्मोजन्मी टिकून राहो! 🥳🎂
🥳🎂 नेहमी पाठीशी उभा राहणाऱ्या
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू फक्त मित्र नाहीस,
तर माझा भाऊ आहेस
आजचा दिवस तुझा आहे, धमाल कर! 🥳🎂
🥳🎂 सुख असो वा दुःख,
जो नेहमी हक्काने धावून येतो
अशा माझ्या लाडक्या मित्राला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तुझा येणारा काळ यशाने
आणि आनंदाने भरलेला असावा, हीच प्रार्थना 🥳🎂
🥳🎂 जगातील सर्वात भारी मित्राला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तू आयुष्यात जे काही स्वप्न पाहिले आहेस,
ते सर्व पूर्ण होवोत
नेहमी असाच हसत आणि हसवत राहा 🥳🎂
🥳🎂 भावा, तुझ्या वाढदिवसा निमित्त एकच इच्छा आहे की,
तू जे काही मिळवू इच्छितोस ते तुला सहज मिळो
वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा, संध्याकाळी पार्टी ठरलीये आपली! 🥳🎂

मी आशा करतो की तुझा वाढदिवस प्रेम आणि हास्याने भरलेला जावो.. व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.. माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
नातं आपलं मैत्रीचे दिवसेंदिवस असच फुलत राहावे, तुझ्या या वाढदिवशी, तू माझा शुभेच्छाच्या पावसात भिजावे.
तुझ्यासारखा मित्र मिळणं म्हणजे नशीबच लागते.तुला आयुष्यात यश,प्रेम आणि खूप आनंद लाभो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Also Read: मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Friend
मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Friend Girl

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🥳🎂
माझ्या चेहर्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, 🥳🎂
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण आणि माझ्या बहिणीला.
तुझ्या चेहऱ्यावरील हे सुंदर हास्य कधीच कमी न होवो,
तुझ्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव राहो
जगातल्या सर्वात भारी मैत्रिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
न सांगता मनातील ओळखणारी
प्रत्येक संकटात खंबीरपणे
पाठीशी उभी राहणारी मैत्रिण लाभणे
हे माझे भाग्य आहे
माझ्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे,
कारण आज माझ्या सर्वात लाडक्या
आणि वेड्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे!
पार्टी कधी देतेयस एवढं सांग? हॅपी बर्थडे ग!

नेहमी हसणारी, सगळ्यांना हसवणारी
आणि स्वतःच्या स्टाईलमध्ये जगणारी
माझी बिनधास्त मैत्रिण!
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
येणारे वर्ष तुला भरभराटीचे जावो!
परमेश्वराकडे एकच प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासू नये
तुझी आणि माझी मैत्री अशीच जन्मोजन्मी टिकून राहो
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
तुझ्या आयुष्याची सुरुवात नेहमी उत्साहाने व्हावी,
आणि प्रत्येक यशाच्या शिखरावर तुझे नाव असावे
जगातील सर्वात सुंदर मनाच्या मैत्रिणीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सगळ्या भावनांना जिथे मोकळ्या मनाने
स्वीकारल जातं ते नातं आमच्या मैत्रीच…
Happy Birthday Dear
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ | Birthday Wishes in Marathi for Brother

🥳🎂 मोठ्या भावासारखा आधार कुणीच देऊ शकत नाही! वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा! 🥳🎂
🥳🎂 भाऊ, तुझ्या वाढदिवसाला तुला सगळ्यात जास्त प्रेम आणि शुभेच्छा! 🥳🎂
🥳🎂 कितीही भांडण झाली तरी समजून घेतलस मला, रसलो कधी तर जवळ घेतलं मला,रडवल कधी तर कधी हसवलं,केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा !दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या. 🥳🎂
🥳🎂 लहान भाऊ, तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस! वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🥳🎂
🥳🎂 भाऊ असतो खास त्याच्याशिवाय जीवन आहे उदास कधी नाही बोललो मी परंतु भावाच्या सोबत वाटतो अनोखा सहवास … Happy Birthday Bhau. 🥳🎂
तिमिरात असते साथ त्याची ,आनंदात त्याचा कल्ला असतो.अनुभवी आणि निरपेक्ष असा मोठ्या भावाचा सल्ला असतो.
🥳🎂 दादा, तुझ्यासारखा भाऊ मिळणं हे पुण्याईच आहे! वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🥳🎂

नात आपलं कधी आंबट तर कधी खारट,कधी तिखट तर कधी गोड अशा माझ्या चविष्ट दादाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
आज तुझा दिवस आहे, मनसोक्त एन्जॉय कर! वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा! 🥳🎂
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ! तू नेहमी असाच हसत राहा आणि आयुष्यात यशस्वी हो! 🥳🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण | Birthday Wishes in Marathi for Sister

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..!
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मला नेहमीच आधार,शक्ती आणि प्रेरणा देणारी एक हक्काची जागा म्हणजे माझ्या बहिणीचे हृदय माझ्या अप्रतीम बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
बहीण ही एक अशी व्यक्ति असते जी तुम्हाला समजून घेते,
तुमची व तुमच्या भावनांची काळजी करते
आणि तुम्हाला खूप सारे प्रेम करते.
ताई तू जगातील सर्व बहीणींपैकी बेस्ट बहीण आहेस
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी
देवाने तुला प्रत्येक क्षणात सुख,आनंद आणि यशाचं भरभरून वरदान द्याव. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
चंद्रापेक्षा सुंदर चांदनी
चाँदनी पेक्षा सुंदर रात्र
रात्रीपेक्षा सुंदर आयुष्य
आणि आयुष्यापेक्षा सुंदर माझी बहीण
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

कधी भांडते, तर कधी रूसते
परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
माझ्या दिदी ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
सागरामध्ये जेवढे मोती,आकाशात जेवढे तारे,तू बघितलेली जेवढी स्वप्न पूर्ण होऊदेत सारे…||
तुझ्यासारखी गोड आणि प्रेमळ बहिण मिळण हे खूप मोठ भाग्य आहे.तुझे जीवन नेहमी आनंदाने आणि यशाने भरलेलं असो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
काळजी रुपी तिचा धाक , अन् प्रेमळ तिची साथ.ममतेने मन ओलेचिंब,जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब…||वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या ताई.
आभाळा एवढी माया,प्रेमळ तिची छाया.ममतेने ओथंबलेले बोल तर कधी रुसवा धरून होई अबोल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
तुझ्यासारख्या गोड आणि प्रेमळ बहिण मिळण हे खूप मोठ भाग्य आहे.तुझं जीवन नेहमी आनंदाने आणि यशाने भरलेलं असो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो / नवरोबा | Birthday Wishes in Marathi for Husband
आपल्या दुखाचे कधी प्रदर्शन मांडत नाही
खूप काही बोलावसं वाटत पण कुणाला सांगत नाही
वेदनांना कुशीत घेऊन ओठ शिवून तो पडून राहतो
सर्वांच्या सुखासाठी एकतारी भजन गातो..!
माझ्या प्रिय नवऱ्यासाठी त्यांच्या वाढदिवशी ही एक कविता समर्पित
जे मिळाले ते गप्प खाणाऱ्या
खातांना माझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
लग्नानंतर लाईफ सुंदर होते हे
ऐकले होते,
पण माझ्यासाठी सुंदर
हा शब्द फार छोटा आहे
कारण माझे
आयुष्य तर Best बनले आहे.
🥳🎂 ️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🥳🎂
तुम्ही मला इतके प्रिय आहेत
की माझ्या हृदयात तुमची जागा
कोणीही घेऊ शकत नाही.
🥳🎂 हॅपी बर्थडे हबी.🥳🎂

कसं सांगू किती प्रेम आहे तुमच्यावर
अगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर.
Happy Birthday Husband
ज्याने माझं आयुष्य प्रेमाने भरलं…
त्या माझ्या जीवापाड नवऱ्याला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
Love you Husband.
कधीच भांडतो तर कधी रुसतो
पण नेहमी एकमेकांसोबत राहतो
Happy Birthday My Husband
नवर्याला वाढदिवस शुभेच्छा
तुझ्या वाढदिवशी मी देवाला एवढंच मागते —
आपलं नातं जन्मोजन्मी असं राहो.
Happy Birthday Husband!
कितीही रागावले मी तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेऊन मनवले मला
कधी रडवले तर कधी खूप जास्त हसवले
केल्या तुम्ही पूर्ण त्या सर्व माझ्या इच्छा
🥳🎂जन्मदिनाच्या माझ्या पतीदेवांना
प्रेमळ शुभेच्छा!🥳🎂
हास्य गोड तुझ्या मुखी
कायम असावे,
मी दिलेले गुलाब
बघून तुला कायम लाजावे. 🥳🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको | Birthday Wishes in Marathi for Wife
तुझ्या असण्यात एक असा धागा आहे ,जो माझ्या प्रत्येक स्वप्नाला जोडतो.
चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!
माझ्या घराला घरपण आणणारी आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही
सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
प्रत्येक सकाळ फक्त तुझा चेहरा पाहून सुरुवात व्हावी,हेच स्वप्न आहे .बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तो दिवस मी कधीच नाही विसरू शकत ज्या दिवशी तुझ्या आणि माझ्या नात्याची सुरुवात झाली होती.
माझ्या आयुष्यात खूप आनंद
आणल्याबद्दल धन्यवाद
आज तुझा वाढदिवस आहे
पण मी तुला वचन देतो
मी तुला कधीही उदास आणि
दुःखी होऊ देणार नाही.
लाडक्या जीवनसाथीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
कपासाठी बशी जशी,माझ्यासाठी प्रिये तू तशी. कायम तुझ्या सोबत राहील,आयुष्यभर तुझाच राहील. Happy Birthday Bayko😍
प्राणाहून प्रिय बायको,
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या
प्रेमळ पतीकडून
खूप खूप शुभेच्छा!
तुझ्या असण्याने,माझ्या असण्याला अर्थ आहे. प्रिय बायको तुझ्याशिवाय माझं जगणं व्यर्थ आहे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या बायको.
तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न यावेत, मनाने नेहमी तुझ्या जवळ असावे, पूर्ण होतील तुझ्या सर्व इच्छा , बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Aai Birthday Wishes in Marathi
आपल्याकडे बोट करून बोलणार्या दुनियेचं दडपण येतं
परंतु आपला बोट धरून चालणार्या हाताचा मोठा आधार वाटतो.
तो हात आईचा असतो.
त्या हाताला आणि आईला चीर काल आयुष्य लाभो !
आई तुझा जन्म दिवस सुखाचा जावो
एकच मागणं आहे देवा
साता जन्मासाठी काही द्यायचं झालं
तर हीच आई लाभू दे मला
जीने आजपर्यंत काहीच
कमी पडू दिले नाही मला!
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आईच्या मायेत विश्वाचे सारे सुख दडलेले असते,तिच्या आशिर्वादाशिवाय जीवन अपूर्ण वाटते.
ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
आईने दिलाय जीवनाला आकार
आई माझ्या जगण्याचा आधार
आईच्या कुशीत होती सर्व स्वप्न साकार
आईशिवाय जीवन निराधार
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
“जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही
हॅपी बर्थडे मम्मी”
बाकीच्यांसाठी तू एक व्यक्ती असशील पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस❤️आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कितीही काळ लोटला तरी माया तुझी ओसंरली नाही तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण येणार नाही असे कधी झाले नाही ❤️
“आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
आई तुला वाढदिवसाच्या
भरपूर शुभेच्छा”
“विधात्याची एक
उत्तम कलाकृती तू
अशी कलाकृती
इतर कोणी निर्माणच करू शकत नाही
तुला शतश: प्रणाम आई”
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या असण्यात जीवंत मी
तुझ्या हसण्यात आनंदी मी
देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो
तुझ्या जगण्यात धन्य मी !
आई! जन्माजन्माची साथी
तुझ्या असण्याने आयुष्य माझे सुंदर
काय सांगू उपकार तुझे,
तुझ्या मुळेच जीवनाला आनंदाची सर
Happy Birthday Aai
माझ्या सर्व चुका माफ करून आपल्या पदरात घेणारी, रागात असताना ही मनापासून प्रेम करणारी, एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे माझी ” आई “.. ❤️आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
तू आयुष्यभर खूप कष्ट केले, आता येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात फक्त आनंद घेऊन येईल, यासाठी मी प्रयत्न करेल, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा आई 🥰
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा | Birthday Wishes in Marathi for Son & Baby
🥳🎂 आम्हाला खरोखरच अभिमान वाटतो
की तुझ्यासारखा गुणी आणि सुसंस्कृत मुलगा आम्हाला लाभला आहे.
आमच्या आयुष्यात तु नेहमीच
आशेचा आणि प्रकाशाचा तेजस्वी किरण राहिला आहे. 🥳🎂
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, बेटा! 🥳🎂
🥳🎂 माझ्या लाडक्या पुत्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा 🥳🎂
तुझ्या सारखा मुलगा मिळायला
भाग्य मोठं लागते…
तू आहेस म्हणून मी आईपण
प्रेमाने जगते
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
आई बाबाला बांधून ठेवणारा
ऋणानुबंध आहेस तू
घरात वावरणारे
खोडकर खेळणं आहेस तू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
प्रिय मुला, हसतमुखाने आयुष्याकडे
वाटचाल करण्याचे एकमेव कारण
तूच आहेस आणि आयुष्याकडे परत
हसून पाहण्याचे एकमेव कारण तूच आहेस.
🥳🎂 वाढदिवसाच्या
शुभेच्छा माझ्या मुला.🥳🎂
🥳🎂 सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला. 🥳🎂
मुलगा असतो वंशाचा दिवा,
जो देतो जुन्या पिढीला नवी दिशा,
आज तुझ्या वाढदिवशी वचन दे तू मला
की घेऊन चलशील आम्हा तू कायम असा
🥳🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🥳🎂
इवल्या इवल्या पावलाने
स्पर्श केला तू घराला
अलगद येऊन इथे
हर्ष दिला मनाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
बाळा, ज्ञान, संयम, आणि करुणा तुझी ओळख ठरो; देवतांची कृपा तुझ्यावर सतत राहो! 🥳
🥳🎂 बेटा, तू करोडोंच्या गर्दीत राज्य करीत राहा, हजारोंच्या गर्दीत झळकत राहा. जसा सूर्य आकाशात तेजाने उजळतो, तसाच तू आयुष्यात नेहमी चमकत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🥳🎂
काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Kaka
माझ्या चांगल्या व वाईट प्रत्येक वेळात
मा झ्या बाजूला उभ्या असणाऱ्या
माझ्या काकांना व काकांच्या रूपात
मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला
सांगू इच्छितो की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती
आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत
प्रिय आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
🥳🎂 आपल्या हास्याने आणि आपुलकीने घरात नेहमी आनंद निर्माण होतो, प्रिय काका तुमचं जीवन सदैव सुख-शांतीने भरलेलं राहो 🥳🎂
🥳🎂 काका, वाढदिवस आला म्हणजे केक जास्त खा, हसत रहा आणि वयाचं गणित विसरा 🥳🎂
आपुलकीने भरलेल्या काकांसोबत प्रत्येक क्षण खास असतो, प्रिय काका तुमच्या जीवनात नेहमी हसू आणि समाधान नांदो
🥳🎂 काका, वय फक्त आकडा आहे, मजा आणि धमाल कायम ठेवा, आनंदाने दिवस साजरा करा 🥳🎂
जे ज्ञान पुस्तकात नाही मिळत
ते तुम्ही मला दिले. आणि
मला आयुष्यात नेहमी योग्य वाट दाखवली.
इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपले अनेक आभार.
काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला लहापणापासून चांगले व वाईट
समजावून एक जवाबदारी व्यक्ती
बनवल्याबद्दल माझ्या काकांचे अनेक धन्यवाद.
माझे गुरू, अखंड प्रेरणास्थान आणि
प्रिय मित्र असणाऱ्या
माझ्या काकाना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
🥳🎂प्रिय काका, तुमच्या आशीर्वादाने आमच्या संसारात आनंदाचे क्षण सतत फुलत राहोत, तुमच्या जीवनात नेहमी प्रेम आणि समाधान राहो 🥳🎂
काका आजच्या या जन्मदिवशी आपणास
दीर्घायुष्याची प्राप्ती होवो हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब | Birthday Wishes in Marathi for Sir / Boss
🥳🎂आदरणीय सर, संस्थेला दिलेले तुमचे नेतृत्व उल्लेखनीय आहे; आज आरोग्य, प्रतिष्ठा, आणि मोठी प्रगती लाभो 🥳🎂
🥳🎂आदरणीय साहेब, कठीण वेळी दिलेल्या आधारासाठी मनापासून धन्यवाद; आज आरोग्य, आनंद, आणि सदैव समृद्धी लाभो. 🥳🎂
🥳🎂साहेब, शिकण्याची प्रत्येक संधी दिल्याबद्दल आभारी आहे; त्यामुळे आत्मविश्वास वाढला; आज मान, प्रतिष्ठा, आणि प्रगती मिळो. 🥳🎂
🥳🎂साहेब, आपल्या मार्गदर्शनाने माझी दिशा ठरली; त्यामुळे लक्ष्य गाठता आले; आज सन्मान, स्थैर्य, आणि दीर्घ कारकीर्द मिळो. 🥳🎂
🥳🎂सर, आज मीटिंग कमी, केक जास्त; पण रिपोर्ट वेळेत देतो; म्हणून सेलिब्रेशन निवांत चालू ठेऊ 🥳🎂
कामाप्रती असणारी निष्ठा
आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन
चालण्याची आपली वृत्ती
खरोखरच कौतुकास्पद आहे
साहेब, आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्यासारख्या कल्पक आणि खंबीर नेत्याच्या
हाताखाली काम करायला मिळणे हे आमचे भाग्य आहे
आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वात काम करताना
आम्हाला दररोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात
साहेब, आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
केवळ एक बॉस म्हणून नाही,
तर कठीण प्रसंगात
पाठीशी उभे राहणारे मार्गदर्शक म्हणून
आम्ही आपल्याकडे पाहतो
साहेब, आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
यशस्वी नेतृत्वाचे उत्तम उदाहरण असणाऱ्या
आमच्या लाडक्या साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपले हे वर्ष यशाचे आणि आनंदाचे जावो.
साहेब, आपल्या नेतृत्वाखाली आमच्या टीमने
अनेक शिखरे सर केली आहेत
आपल्या भावी वाटचालीस
आणि आजच्या वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
नेहमी हसतमुख राहून संपूर्ण ऑफिसला ऊर्जेने भरून टाकणाऱ्या
आमच्या साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपले सर्व संकल्प पूर्ण होवोत.
नवनवीन आव्हानांना तोंड देत
कंपनीला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या
आमच्या आदरणीय साहेबांना
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
साहेब, देव आपल्याला उदंड आयुष्य,
उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी देवो, हीच प्रार्थना.
आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
कामाचा ताण असतानाही
सहकाऱ्यांची काळजी घेणारे
एक आपुलकीचे नेतृत्व…
आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🥳🎂आदरणीय साहेब, वेळेवर फीडबॅक दिल्यामुळे काम सुधारले; आज शांत मन, कुटुंबाचा आनंद, आणि मोठ्या संधी लाभोत. 🥳🎂
🥳🎂बॉस, तुमचा केक पाहून डेडलाइन घाबरली; म्हणून ती उद्यापर्यंत थांबेल; आज मजा करा कुटुंबासह क्षण 🥳🎂
🥳🎂सर, आज ऑफिसची मीटिंग कमी ठेवू; आपण फक्त केक कापू; हशा आणि शुभेच्छा भरपूर 🥳🎂
मजेशीर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Funny Birthday Wishes in Marathi
“माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मित्रा तुझ्यासाठी मी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस.”
“एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा..!!!
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा..!!!”
“माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
🥳🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुझ्या केकवरच्या मेणबत्त्या विझवायला यंदा फायर ब्रिगेड बोलवावं लागेल! 🥳🎂
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या,
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…!!!
🥳🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुम्ही माझे पती आहात — म्हणजे तुम्हाला पर्याय नाही! 🥳🎂
🥳🎂तुझ्या वाढदिवसाला एकच विश — तुझं खरेदीचं बजेट वाढो! बाकी तू आधीच भारी आहेस! 🥳🎂
“भाऊंबद्दल काय बोलायचं इ.स………साली भाऊंचा जन्म झाला.
आणि मुलींच नशीबच उजळलं. लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी, साधी राहणी उच्च विचार. सतत नवीन नवीन फोटो काढून..!
लाखो मुलींना impress करणारे.
आपल्या cute smile ने #हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे.
गावचे चॉकलेट बॉय #मनानं दिलदार#बोलणं दमदार# आणि वागणं रूबाबदार…!!! आमचे मित्र यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा…!!!
“खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा”
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Birthday Kavita in Marathi
आजचा दिवस तुझा आहे माझ्या प्रियेचा आहे
उत्सव आणि आनंद चालू राहू दे
माझ्या अद्भुत पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वादतुम्ही संकटात आणि संकटात माझ्या पाठीशी उभे राहता
आतून येणाऱ्या संयमाने
तुमच्या प्रेमाने माझे खोलवरचे जखमा भरले आहेत
ताऱ्यांमध्येही माझ्यापर्यंत पोहोचले आहेमी आज तुमचे सुंदर हृदय साजरे करतो
आणि निःस्वार्थ प्रेमाचा मार्ग
तुम्ही आजूबाजूच्या प्रत्येकाची काळजी घेता
जिथे खरी करुणा आढळू शकतेतुमचा वाढदिवस तेजस्वीपणे चमकू द्या
शुद्ध आणि तेजस्वी प्रकाशाने भरलेला
तुमचा अर्थ शब्दांपेक्षा जास्त आहे
आज उद्या आणि नेहमीच दररोजतुमच्यावरील माझे प्रेम कधीही संपणार नाही
माझा प्रियकर माझा जोडीदार माझा सर्वात चांगला मित्र
तू जसजसा मोठा होतो तसतसा वेळ वेगाने पुढे जातो
तुला कधीच कळणार नाही त्यापेक्षा जास्त
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा प्रवास नुकताच सुरू झाला आहेतू माझ्या आयुष्यात इतका आनंद आणतोस
कोणत्याही संघर्षातून बाहेर पडणे
तुझे हास्य सर्वात काळ्या दिवसाला उजळवते
माझ्या सर्व भीती दूर करणेतुम्ही ज्या व्यक्ती बनत आहात त्याचा मी आनंद घेतो
तुमच्या उज्ज्वल भविष्याचा मी आनंद घेतो
सूर्याच्या उगवत्या ते मावळत्यापर्यंत हा वाढदिवस मजेने भरलेला जावोतुमच्या क्षमतेला अंत नाही
माझा प्रिय मुलगा, माझा मित्र
मी या सर्व परिस्थितीत तुम्हाला साथ देईन
तुम्ही पडताच तुम्हाला पकडेनतुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे
तुम्हाला भरभराट होताना आणि वाढताना पाहणे
शिवमय वाढदिवसाच्या शुभेच्छा | Shivmay Birthday Wishes in Marathi
सुर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगचं समजला नसता, जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता, आपणास आशीर्वाद लाभो जिजाऊचे आणि शिवरायांचे, वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..
आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता 🚩 सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना 🏰 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो 🥳🎂
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा 🚩
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🥳🎂 ह्याच वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🥳🎂
छत्रपति शिवाजी बनले आई जिजाबाईच्या शिकविणीने, भवानीच्या तलवारीने सिंहाच्या गर्जनेने आणि दुष्टांच्या संहाराने आपणास आशीर्वाद लाभो जिजाऊचे आणि शिवरायांचे, वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण, तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी, तुमच्या हृदयात सतत तेवत राहो, हीच मनस्वी शुभकामना, वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात 🙏
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह 🚩
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
🥳🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🥳🎂
छत्रपति शिवाजी बनले
आई जिजाबाईच्या शिकविणीने
भवानीच्या तलवारीने
सिंहाच्या गर्जनेने आणि
दुष्टांच्या संहाराने 🚩
आपणास आशीर्वाद लाभो
जिजाऊचे आणि शिवरायांचे
🥳🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🥳🎂
वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ
Happy Birthday ला मराठीत काय म्हणतात?
Happy Birthday ला मराठीत “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असं म्हणतात. बोलताना “वाढदिवसाच्या शुभेच्छा” किंवा फक्त “हॅपी बर्थडे” असंही म्हटलं जातं. काही ठिकाणी “जन्मदिनाच्या शुभेच्छा” हा शब्दही वापरतात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत कशा द्याव्यात?
सर्वात आधी त्या व्यक्तीचं नाव आणि नातं लक्षात घ्या. मित्राला मजेशीर, आईवडिलांना आदरपूर्वक आणि जोडीदाराला प्रेमळ शब्द वापरा. शुभेच्छा लहान आणि मनापासून असाव्यात, कारण साध्या शब्दांतली आपुलकीच जास्त लक्षात राहते.
WhatsApp वर मराठी शुभेच्छा कशा पाठवाव्यात?
या पानावरची तुम्हाला आवडलेली शुभेच्छा कॉपी करा आणि WhatsApp मध्ये पेस्ट करून पाठवा. तुम्ही त्यात त्या व्यक्तीचं नाव घालून मेसेज आणखी खास बनवू शकता. शुभेच्छांचे फोटो पाठवायचे असतील तर ते डाउनलोड करून थेट शेअर करता येतात.
रात्री १२ वाजता शुभेच्छा द्याव्यात का?
जवळच्या मित्रांना आणि कुटुंबाला रात्री १२ वाजता शुभेच्छा देणं ही अनेकांची आवडती पद्धत आहे, आणि त्यामुळे ते क्षण खास बनतात. पण ती व्यक्ती झोपत असेल किंवा उशिरा जागी राहत नसेल तर सकाळी शुभेच्छा देणं योग्य ठरतं.
वाढदिवसाच्या शुभेच्छा उशिरा द्यायच्या असतील तर काय करावं?
शुभेच्छा द्यायला उशीर झाला तर सुरुवातीला मनापासून माफी मागा आणि मग शुभेच्छा द्या. उदाहरणार्थ, “उशीर झाल्याबद्दल माफ कर, पण तुझ्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!” असं लिहिणं पुरेसं असतं. उशिरा दिलेल्या शुभेच्छाही प्रेमाने दिल्या तर तितक्याच मौल्यवान ठरतात.
या लेखातील शेवटचे शब्द
हे या लेखाचे शेवट चे शब्द आहेत मला अपेक्षा आहे क्या ये लेख मधून आपन आपल्या त्या महत्वाच्या व्यक्तीचा आज हा खास दिवस शुभेच्छा देऊन आणखीन खास कराल.
शुभेच्छा चे शब्द छोटे असले तरी त्यामागची भावना खूप मोठी असते. एखाद्याच्या वाढदिवशी पाठवलेली एक छोटीशी शुभेच्छा त्यांना दिवसभर आनंद देऊ शकते. म्हणून योग्य शब्द निवडा, त्यात तुमचं नाव आणि आपुलकी जोडा, आणि शक्य असेल तर एक फोन कॉल करायला विसरू नका.
आम्हाला आशा आहे की इथल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आवडल्या असतील. तुम्हाला हे लेख उपयोगी वाटलं असेल, तर ते तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा.
तुमची आवडती शुभेच्छा कोणती ठरली, ते कमेंटमध्ये सांगा. आम्ही नवीन शुभेच्छा नियमित जोडत राहू, म्हणून पुन्हा नक्की भेट द्या.
तुमच्या प्रियजनांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂
